आता एक प्रेक्षक या नात्याने आपण त्या सिनेम्या कडे कसे पाहाल हे मला आणि मनोगतीना जाणायला आन्नद होईल.
माझा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन असा आहे.
साधारणपणे बहुतेक शिणेमे ल्यापटॉपवर बघत असल्याने ल्यापटॉप टेबलावर साजेशा अंतरावर ठेवावा. खुर्ची आरामदायी आहे की नाही हे पाहावे. ल्यापटॉप सुरू करावा. चहा ठेवावा. चहा होईस्तोवर व्हिस्टा सुरू होते. मग गरमगरम चहाचा कप, वाटल्यास तोंडात टाकायला काहीतरी अशी तयारी करून खुर्चीत स्थानापन्न व्हावे. नजर ल्यापटॉपच्या पडद्यावर स्थिर करावी. शिणेमा सुरू करावा आणि त्याचा आनंद लुटावा.
हॅम्लेट
ताक : चुकून घजनीसारखा सिनेमा असेल तर चहा संपेपर्यंत सहन करावा आणि मग बंद करून एखादे लोकोपयोगी विधायक कार्य करावे.