इथे नाहीस तू माहीत आहे पण मनासाठी
जरा हाका तुला मारून जातो खालच्याखाली
रडावे बालकाने, केस कापावे हजामाने
तशी ही जिंदगी म्हणते, चला झाली, चला झाली.. हे दोन शेर अतिशय भावलेत....त्यात खूप दर्द आहे
मतल्यातील दुसरा मिसरा जास्त 'बोल्ड' वाटतो आहे... काही गोष्टी संकेतात्मक लिहाव्यात.. अन्यथा शेराची पातळी घसरते असे माझे वैयक्तिक मत आहे..
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे.... वानगीदाखल!
केसातल्या गंधाच्या, किंवा देहातल्या गंधाच्या असे म्हटल्यास आशयात आपल्या दृष्टीने किती फरक पडतो आहे?
-मानस६