कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असल्याचे दाखवले जात असले तरी एसएमएसची वेळ रात्री ९.०० वाजेपर्यंतच मर्यादित होती. ९ नंतर एकाही स्पर्धकाच्या नावाखाली एसएमएससाठीचे आवाहन आले नाही. त्यामुळे किमान यावेळी तरी फसवाफसवी केली असे म्हणता येणार नाही.
राहिला मुद्दा कार्तिकीला विजयी घोषित करण्याचा.
संपूर्ण स्पर्धेत कार्तिकी ही एकमेव अशी गायिका होती जिने सर्व प्रकार सादर केले. गझल, लावणी, लोकगीते, भारूड, भावगीते... बाकी मात्र आपापल्या शैलीत काहीसे अडकून पडले. प्रथमेशचा तर प्रश्नच नाही. तो बैठकीचा गायक आहे. आणि लवकरच आपण त्याला ऐकू यात शंकाच नाही. त्यामुळेच वैविध्याचा विचार करता कार्तिकी उजवी ठरते.