मुग्धाची सगळीच गाणी बालगीते वाटत होती :) 

प्रथमेशची गाणी दुर्दैवाने शेवटच्या टप्प्यामध्ये तितकी चांगली झाली नाहीत.

रोहित आणि कार्तिकी अंतिम फेरीत असणे हेच अनेकांना खटकलेले होते असे दिसते. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीपासून अंतिम फेरीपर्यंत या दोघांमध्ये झालेला बदल हा वाखाणण्यासारखा होता. कार्तिकीची हात नका लावू माझ्या साडीला, नवरी नटली, लिंगोबाचा डोंगर, वाटेवर काटे वेचित चाललो, माझिया प्रियाला प्रीत कळेना ही गाणी अप्रतिम होती.

सात रुपयांना एक एमेमेस म्हटल्यावर पुणेकरांनी आर्यासाठी किती एमेमेस केले असतील देव जाणे. :)


मात्र अंतिम फेरीपर्यंत यापैकी कोणीही विजेता झाला तर चालेल - सगळेच विजेते आहेत असे म्हणणाऱ्यांची आताची प्रतिक्रिया विनोदी वाटते.


श्रीनिवास खळे, श्रीधर फडके, देवकी पंडित, संजीव अभ्यंकर, सुरेश वाडकर यांनी दिलेला निकाल एकूण व्यवस्थेबाबत असे काय मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहे समजले नाही