सर्वांचेच धन्यवाद!
मानस साहेब,
आपुलकीने आपण मनातले लिहिलेत याबद्दल धन्यवाद!
खरे तर काव्यातून सवंगता मी स्वतःच टाळण्याच्या बाजूचा आहे.
मतल्यात 'वक्षातल्या' हा शब्द 'देहातल्या' वा 'केसातल्या' ऐवजी घेण्याची माझ्यामते असलेली कारणे देण्याचा प्रयत्न करत आहे.
१. स्त्री जर नाहून आली अन घरात किंवा इतरत्र वावरली तरीही तिच्या केसांचा सुगंध आजूबाजूला पसरू शकतो व तो जाणवू शकतो.
२. तसेच तिच्या देहाचा गंधही जाणवू शकतो.
पण या दोन्ही केसेसमध्ये ते सुवास ज्याला जाणवतात तो व ती स्त्री हे एकमेकांच्या निकट असलेच ( मनाने ) पाहिजेत असे आवश्यक नाही.
'वक्षातल्या' या शब्दातून जी एकेकाळच्या निकटतेची शक्यता व्यक्त होऊ शकते ती देहातल्या किंवा केसातल्याने होणार नाही असे मला वाटते.
आता ही निकटता सिद्ध करण्याचे कारणः
प्रेमाच्या किंवा सहवासाच्या कुठल्या पातळीवर असताना प्रेयसीने कवीशी बेवफाई केलेली आहे हे तीव्रपणे जाणवावे म्हणुन!
आणखीन एक कारण - 'उलाढाली' हा शब्द 'एक बऱ्यापैकी काफिया आहे' म्हणून घेतलेला नाही. 'बदलत राहणे' हे नमूद व्हावे म्हणून ते आहे. ( हे जरा जास्त स्पष्ट आहे यासाठी माफ करावेत. ) ती गोष्ट केसांची किंवा देहाची होईलच असे नाही.
आपण मनापासून प्रतिसाद दिलात व दखल घेतलीत, तसेच प्रेमाने परखड लिहिलेत यासाठी आदरपुर्वक आभार!
आपल्या प्रतिसादांचा पुढेही अभिलाषी राहीन.
धन्यवाद!