दावेदार हा शब्द मराठीत शत्रू, दुष्ट, खुनशी अशा अर्थानेच वापरतात, हक्कदार किंवा मागणीदार अशा अर्थाने नाही >>
"दावेदार आहे" असा गुगल मध्ये शोध घेतला असता अनेक ठिकाणी मराठीत हा शब्द वापरलेला दिसला. हा शब्द जास्तकरून हिंदीत 'हक्कदार' या अर्थाने वापरला जातो, मराठीत नाही, हे मान्य. पण अधिक समर्पक शब्द न सुचल्याने वापरला. या चर्चेच्या संदर्भात कोणी शत्रू, दुष्ट, खुनशी असा अर्थ घेईल असे वाटत नाही.
आर्या, प्रथमेश किंवा रोहित यांच्यापैकी कोण अधिक योग्य यावर प्रतिसादकाचे ठाम मत नाही. >>
हे तिघेही विजेतेपदावर हक्क सांगण्यासाठी अधिक लायक होते असे मला सुचवायचे आहे.
परीक्षक आणि पंच ह्यांचे संगीताचे ज्ञान आपल्यापेक्षा शेकडो पटीने वरच्या दर्जाचे होते. त्यांच्या निकालावर भाष्य करणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे.>>
पहिला भाग १००% मान्य. दुसरा भाग अमान्य. (मुळात हा त्यांचा निकाल आहे हेच पटत नाही)
केवळ sms च्या आधारावर निकाल जाहीर केले असते तर काहीच वाटले नसते. पण परीक्षकांची यादी पाहिल्यानंतर हा निकाल अधिकच धक्कादायक वाटला. (त्यामानाने मॅथ्यू हेडन हा सचिन तेंडूलकरपेक्षा श्रेष्ठ फलंदाज असल्याचा आयसीसीचा शोध कमी धक्कादायक होता असे आता वाटते)
ऋचा मुळे यांचा प्रतिसाद आवडला. पण त्यांनी मांडलेल्या निकषांचा विचार केला तरी ४, ७, ८ सोडून इतर बाबतीत आर्याचे गाणे कार्तिकीपेक्षा चांगलेच होते.(आधीच्या सर्व भागांतल्या परीक्षकांच्या कॉमेंटस लक्षात घेतल्या तर हे पटायला हरकत नाही)
मात्र स्पर्धेच्या सुरुवातीपासून अंतिम फेरीपर्यंत या दोघांमध्ये झालेला बदल हा वाखाणण्यासारखा होता. >>
अगदी मान्य, पण हा बदल पहिल्यापासून सातत्याने गाणाऱ्यांना मागे टाकून विजेती होण्याइतका खरोखरच होता का ? एवढाच प्रश्न आहे. (ऋचाताई हा सातत्याचा मुद्दा विसरल्या !!)
राहता राहिला काही निष्पन्न होण्याचा मुद्दा. आंतरजालावरच्या चर्चेतून प्रत्येकवेळी काही निष्पन्न होईलच असे नाही, तशी अपेक्षाही नसते. पण बोलल्याशिवाय राहवत नाही ना !!
एक राहिलं,
सात रुपयांना एक एमेमेस म्हटल्यावर पुणेकरांनी आर्यासाठी किती एमेमेस केले असतील देव जाणे. :) >>
हा हा. आवडले आणि पटले.