राम जोशीनी अतिशय मार्मिकपणे द्व्यर्थी शब्दांचा वापर करत रचना केली आहे. दोन गवळणी आपासात बोलत चालल्या आहेत.

अंबर या शब्दाचे दोन अर्थ- वस्त्र आणि आकाश.

पय- म्हणजे पाणी आणि दुध. म्हणून पयोधर म्हणजे ढग(पाणी धारण करणारे) आणि स्तन सूद्धा.

मारुत - वारा

मेघोदर- ढगांचा अंतर्भाग.

एक गवळण म्हणते "अंबरामधील (वस्त्र/आकाश) पयोधराशी (ढग/ स्तन) खेळतो.  ''

कोण नंदाचा मुलगा हरी का ग?''

''नव्हे ग! मी आकाशातील ढगांबाबत बोलते आहे! वारा ढगात खेळतो, असे म्हणाले मी!"

यातून चावट भाव प्रगट होतो. राम जोशांच्या अशा अनेक शृंगारिक रचना प्रसिद्ध आहेत.