सकारात्मक सुसभ्य जगतातल्या, जाहिरातीत, सहसा नकारात्मक भाग झाकणे व सकारात्मक भाग वाखाणलेला [ आहे त्या पेक्षा जास्त फुगवून सांगीतलेला /दर्शविलेला ] असतो. तुम्ही जे लक्षण वर्णन केले, त्यात, डोके झाकलेले, चेहरा झाकलेला, हात-पाय झाकलेले, कारण काय? तर बुद्धिदारिद्र्य , सौंदर्यदारिद्र्य आणि कर्मदारिद्र्य. मग उरते काय? माल तर खपला पाहिजेनाऽऽऽ. [ हे सगळे विपणन व्यवस्थापनशास्त्र या दृष्टिने घ्यावे, शब्दांचे वस्तुनिष्ठ अर्थ काढावेत. ] मग करा उदात्तिकरण नकारात्मक गुणांचे, व्यक्तींचे, कर्मांचे वा अवयवांचे. [ खोटे ओरडून ओरडून सांगा / दाखवा---गोबेल्सचे तंत्र ].
ज्या कोणी मुलीने, स्त्रीने, महिलेने, मुलाने वा माणसाने असे प्रथम [ समाजात व स्वतःच्या आयुष्यात प्रथम] केले असेल त्याने /तीने, प्रायोगिक विपणन करून पाहिले, काही त्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतीसाद [ सुसभ्य समाजाच्या दृष्टीने नकारात्मक प्रतीसाद] तीला /त्याला मिळाला असेल, की झाले, अनुकरणप्रिय समाजबांधवांचे अनुकरण सुरु.
हे नकारात्मक, यासाठी की " सुसभ्य नागरीकरण झालेल्या समाजात", व्यक्तीच्या, वैयक्तीक गुणांच्या विपणनाचा उतरता क्रम हा, डोक्यापासून [बुद्धिपासून] सुरू होतो,पण गुप्तांगा पर्यंत कधीच पोहोंचत नाही. पण असभ्य वा अर्धसभ्य [स्वयंघोषीत, अर्धी सभ्यता धनार्जनाने आलेली, ज्ञानार्जनाने नाहीच, अशी] समाजातील, तशाच व्यक्तींच्या वैयक्तीक गुणांचे[? ] विपणन, जर डोक्यापर्यंत संपत असेल तर मग, तुमची, आमची अडचण आहे या समाजात. असे अनेक समाज हळू हळू महाराष्ट्रात मुळ धरू लागले आहेत. मग तुमच्या आमच्या बाई-बापडींना संसर्गाचा धोका सुद्धा नक्कीच आहे. त्या अर्थाने अशी चर्चा साधक जास्त व बाधक कमीच आहे.
हे मी काही वेगळे सांगत नाहिये. लग्न, संभोग, आपत्य, सुसभ्य देखील करतात, असभ्य देखील करतात. मार्ग निवडीचा, फरक असल्याने एक सभ्य तर दुसरा असभ्य. बाकी सगळ्या नैसर्गीक गरजा सगळ्यांच्या सारख्याच. पण कोणी रूढी, निती, संयम, कायदा पाळून करतो, कोणी सगळे धाब्यावर बसवून करतो. "साधन शुचितेचा" काय तेवढा फरक.
अशी चर्चा घडवून आणल्याबद्दल " मनोगत" चे व सर्व सहभागींचे खुप धन्यवाद!