तुमची बाग खरंच हेवा वाटावी अशीच असणार.  जाई, कोयनेल, अबोली, मोगरा, गुलाब, कोऱ्हांटी, जास्वंद, गुलबक्षी, कण्हेरी, सदाफुली, चीनी गुलाब, हजारी मोगरा - किती प्रकार!!  आजकाल नर्सरीतही अशी खरी आपली झाडं मिळत नाहीत.  आता म्हणजे सगळी कार्नेशन, जरबेरा, जॅकारांडा, लँटाना, अँथुरियम, फूटबॉल लिली, झिनीया अशी साहेबी झाडं मिळतात.  ही झाडं आणि यांची फुलं दिसायला आकर्षक असतात पण तरीही का कुणास ठाऊक, आपल्या झाडांसारखी नैसर्गिक, स्वैर, मुक्त वाटत नाहीत. 

सुंदर लिखाण.  पु. ले. शु.!