हे मला आलेले अमेरिकेतील अनुभव आहेत आणि दिसलेले येथील जग आहे. वारीच्या सुरवातीसच तसे उल्लेखलेले आहे. त्यात कौतुक करण्यासारखे काही दिसले तर तसे किंवा अयोग्य काही दिसल्यास (उदा. मेडिकल प्रॉब्लेम्स, मॉलमधील वेळखाऊपणा ख्रिश्चन धर्माचा प्रचार इ. )यांचाही उल्लेख केला आहे. भारताविषयी लिहिणारे खूपच आहेत आणि ते आपण दररोज अनुभवतोच आहे. त्यातही मला काही अनुभव भारतात आले त्याविषयीही मनोगतवर लिहितोच आहे उदाःलाखमोलाची माणस किंवा गोष्ट पाच रुपड्यांची असे अनुभव भारतात आलेले तेही शब्दांकित करतोच आहे.वारीचे भाग सोडल्यास बाकी माझे सर्व लिखाण भारतातील अनुभवावर आधारितच आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !