शूरवीरांच्या कथांचे निरूपण चालवावे, घडोघडी अपराधाचा तोल सावरावा, हे देखील ठासून दाखवावे, सांगावे. गप्पा नेहमी शूरविरांच्याच कराव्यात, त्यांचेच सतत दाखले द्यावेत. उपकरणांवरचे अवलंबन कमी करण्यासाठी, सतत स्वतःची बुद्धी, डोळे, स्मरणशक्ती वापरण्याची सवय लावावी.

गोष्टींची पुस्तके शूरविरांचीच असावीत,  TV फेकून द्यावा, संगणकातले गेम्स 'नष्ट' करावेत. मार्शल आर्टची घरात स्वतः जाहिरात करावी, अमिताभचे अँग्री, यंग मॅन चित्रपटांचा मेंदूवर सतत मारा करावा. घरात सुभाषचंद्र बोस, पोलव्हॉल्टपटू--सर्गेई बुबका, फूटबॉलपटू, ऍथलीटसचे मोठे फोटो लावावेत. शरिरात लोह, कॅल्शीयम, व्हिटॅमीन 'सी' प्रचूर प्रमाणात जातील याची तजवीज करावी. घरात चेतना देणारे सुविचार लावावेत. [ घराची शोभा, सुविचार लावण्यामुळे, कमी होणार नसेल तरच लावावेत. शोभा महत्त्वाची, व्यक्तीमत्व काय, आज नाही उद्या घडेल, नाही का? ]

वन्ही तो चेतवावारे, चेतविताची चेततो । सारखी उपाययोजना करावी.

फँटम, बहादूर, लंबू-मोटू सारखे कॉमिक्स, देशप्रेमावरचे, युद्धाचे माहितीपट/ चित्रपट देखील दाखवावेत.

उपाययोजना अंमलात आणण्यापुर्वी तज्ञांचा सल्ला घेणे अपरिहार्य आहे.