घार, गरुड तत्सम उंचच ऊंच विहार करणारे पक्षी, पिलांना कसे घडवतात ते टाईम्स मध्ये, 'स्पीकींग ट्री' सदरात, मानसशास्त्रज्ञाचा लेख, वाचल्याचे आठवले. पक्षी, अति ऊंच ठिकाणी, निमुळत्या जागी, घरटे बांधतात. पिले 'प्रशिक्षणा'ला सक्षम झाली की, मादी वरून त्यांना घरट्यातून ढकलते, खाली काही फुटांवर, नर त्यांना पकडतो. या कालावधीत / अंतरात पिलांनी आपले 'पंख' उघडून फडफडावेत अशी त्यांची अपेक्षा असते / असावी. हा क्रम कधी, नर, वर वा मादी वर असा बदलत असतो. [म्हणजे आई - बाबात मतभेद नाहीत, हेच ते पिलांना / मुलांना "प्रत्यक्ष कृतीने" दाखवित असावेत. ] नंतर हे अंतर देखील वाढत-वाढत जाते, ते त्यांची 'झेप'  वाढावी म्हणुनच.

म्हणतात ना, एक गरुडच दुसऱ्या गरुडाला घडवू शकतो, एक वाघच, दुसऱ्या वाघाला, आणि एक शार्कच दुसऱ्या शार्कला घडवू शकतो. " प्रशिक्षणाचे महत्त्व आहेच" योग्य प्रशिक्षक / गुरू शोधावा. "शोधा म्हणजेच सापडेल." त्याच बरोबर "मित्रकंपनी" चे पण फार महत्त्व आहेच.

हक्क, अधीकाराचा नकारः मुलांना वरून ढकलण्याचा सल्ला ईथे दिलेला नाही. अपघाताची जबाबदारी ज्याची, त्याची.