व्यायामाला व्यायाम, खेळाला खेळ. परत एकटा, जर हवेत शटल मारत खेळत राहिला, तर "एकाग्रता" वाढविण्याचा / मन नियंत्रीत ठेवण्याचा / शीघ्रातीशीघ्र, भरकटलेल्या मनाला / मेंदूला झटकन ताळ्यावर आणण्याचा मला भावलेला "राजमार्ग". मी अभियांत्रीकीचा रात्री अभ्यास करताना, एखादी संकल्पना, ३ वेळेस वाचूनही समजत नसल्यास असे उपाय योजत असे वा ५०/६० हिरवे वाटाणे एखाद्या खोलीतल्या छोट्या वस्तुंना "नेमके" मारत असे. एकाग्रता कमालीची वाढते.---स्वानुभव.

हो, पण कमीतकमी, ५०० वा जास्तितजास्त १००० वेळेस  शटल न पडता मारावे. म्हणजे परिणाम लवकर साधतो.

असे उपाय नंतर "भिष्मराज बाम" यांच्या पुस्तकात वाचायला मिळाल्यानंतर देवाला असे उपाय योग्यवेळी सुचवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद दिले.

धन्यवाद.