२. पुरूष ज्वालाग्रही पदार्थ, स्त्री ठिणगी. यात स्त्रीने ठिणगी व्हावे की नाही हे (योग्य तो पेहराव करून) ठरवावे. मग पुरुषाने स्वतःच्या मनावर ताबा ठेवण्याची काही सोय नाही का?

एकंदर आपल्या लेखावरून आपण सात्त्विक सारवासारव करत आहात हे सिद्ध होते. "भौतीकशास्त्राचा" न्युटनचा ३ रा नियम: समाजशास्त्रात जास्त प्रकर्षाने सिद्ध होतो. क्रिया तशी प्रतिक्रिया. आपल्यासारखे, माझ्यासारखे सात्त्वीक लोक अशा अनेक गोष्टींकडे "कानाडोळा"च करत जगतात. पण थोड्याशा उत्तेजनाने गुन्हे करणारे [संख्याशास्त्रानुसार] जास्त. या वाटचुकलेल्या, भगिनींनी "बळी" ठरण्यास यांनी स्वतःच  हातभार लावू नये एवढिच आमची इच्छा. अन्यथा कोणीच दुःखात सहभागी नसणार. "सातच्या आत घरात" ली ही संस्कृती नक्कीच नाही, एवढेच आम्हाला समजते.

दोस्ताना [जुना] चा अमिताभचा डायलॉग आठवतो. अमिताभः देविजी, आप अजंता की मुरत बनकर सडकपर घुमेंगी, तो लडके सिटी नही बजायेंगे तो क्या मंदिर मे जाकर घंटी बजायेंगे?

म्हणे "पियर प्रेशर". माझ्या [सुंदर] वर्गमैत्रीणी, याच प्रेशर मध्ये येवून अभ्यास करून रँक / डिस्टिंक्षन "कमवायच्या". मुली जर रेड लाईट मधील महिलांना "पियर" समजत असतील, तर या पेक्षा मोठे दिवे लावण्यास त्या मोकळ्याच राहतील.

धन्यवाद.

[ वस्तुनिष्ठ अर्थाने सर्व शब्द घ्यावेत, शास्त्रीय दृष्टिकोनातून अपरिहार्य शब्द तेवढेच वापरले आहेत. ]