इंजिनीयरींला असताना आम्ही रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत अभ्यास करायचो. असेच एक दिवस रात्री १२.३० वाजता चहा पिण्याची हूक्की आली. आम्ही पाच room-mates, निघालो जवळच्या टपरीवर चहा प्यायला. जातांना सगळे night-pant घालूनच निघालो. आमच्या दोन खोल्या होत्या. त्यांना आतुन एक सामाईक दरवाजा होता. त्यामुळे एक खोली आतून बंद करून फक्त दुसरी खोली आम्ही येण्या-जाण्यासाठी वापरत आसु. आमचे कुलुप पॅडलॉकचे होते म्हणजे कुलुप लावण्यास चावी ची गरज नाही. तर ... आम्ही सर्व निघालो, सगळ्यांना वाटले चावी घेतली असेल कुणीतरी. बस्स.. इथेच घोटाळा झाला. मस्त एकमेकांची उडवत, हासत-खिदळत चहा पिऊन १. १५ वाजत आलो. पाहतो तर काय कुणाकडे ही चावी नाही. सगळे एकमेकांना दोष देत बसले. सगळ्यांची एकच बोंब pant बदलल्यामुळे चावी खोलीतच राहीली. आता काय करायचे. एवढ्या रात्री कुठे जायचे. आता एकच पर्याय होता कुलुप तोडणे. मग कुणी दगड आणायला गेले, कुणी रस्त्यावर लोखंडाचे काही भेटते का ते शोधायला गेले. दगड मारून मारुन शेवटी दगड फुटले पण कुलुप काही तुटाण्याचे नाव घेत नव्हते. बऱ्याच प्रयत्नांनंतर सर्वानी हात टेकले. एव्हाना २.०० वाजले होते, झोप तर कुठल्याकुठे पळाली होती.
आम्ही खिडकीचे दार कधी-कधी उघडे ठेवत असू ,अचानक मला एक युक्ती सुचली. मी "आयडिया s s s" असे काहीसे ओरडुन तडक खिडकीपाशी गेलो. पण आज देव जरा जास्तच परीक्षा घेत होता. खिडकी आतमधून बंद होती. पण मी हार मानणारा नव्हतो. कारण आज काही तरी "कर्तुत्व" दाखवण्याची संधी आली होती ना. खिडकीच्या वरच्या झापड्या नक्की उघड्या असणार म्हणून खिडकीत चढलो आणि पहीले यश मिळाले. झापड्या उघडल्या आणि मध्ये हात घालून खिडकी उघडली. केवढा आनंद झाला सगळ्यांना. एक आशेचा किरण त्या आंधाऱ्या खोलीतून बाहेर येत होता.
पण हा आनंद फार काळ टिकला नाही. ज्या खुंटयांना सर्वांच्या pants अडकविल्या होत्या त्या आमच्यापासून कीमान १०-१५ फ़ूट लांब होत्या. सर्वात अलिकडे माझी pant होती. सर्व मदार आता त्याच pant वर होती , त्यात मला नक्की आठवत नव्हते कि चावी त्यात आहे की नाही ते. बाजुला असलेली काठी घेऊन थोडा प्रयत्न केला पण असे लक्ष्यात आले कि चुकुनही जर pant खाली पडली तर सगळे संपणार होते. आता एक पर्याय होता तो म्हणजे एखादा लोखंडी आकडा ज्यात pant अडकवून बाहेर आणता येईल. दुसऱ्याक्षणी बाहेर असलेली कपडे वाळू घालण्याची लोखंडी तार कढली , त्यावरचे कपडे दिले फेकून बाजुला. तारेच्या एका टोकाचा छोटा आकाडा केला. आणि टाकली तार खिडकीमधून आत. ती तार पण फार लवचीक, जाताजाईना pant जवळ. अंगाच्या चित्रविचित्र हलचाली करून शेवटी तार कशीतरी pant मध्ये आडकली. आता pant खुंटीपासून अलग करण्यासाठी थोडा हिसका मारला आणि ती नेमकी खाली पडली. बस्स ... काळजाचा ठोका चुकला , कुणीतरी ओरडले "अरेरेरे... गेले सगळं पाण्यात". हळुच तार ओढून पाहीली, आणि हायसे वाटले. अजून ही pant तारेत अडकून होती. फारच काळजीपुर्वक हलचाली करून शेवटी एकदाची ती बाहेर काढली.
आणि अहो आश्चर्यम चावी खिशात सापडली!!!
क्षमस्व: शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका असतील. सुधारत आहे.