कार्तिकीने आपल्याला माहीत नसलेली अनेक गाणी सादर केली, इतरांचे तसे नव्हते. सर्वज्ञात भावगीते मूळ गायक-गायिकेप्रमाणे अस्सल प्रकारे सादर करणारे अनेकजण आहेत.  परंतु अप्रसिद्ध असली तरी लोकांना पहिल्या श्रवणातच आवडू लागतील अशी गाणी फक्त कार्तिकीच गायली. तिचे संगीत कसे होते हे तज्ज्ञ सांगतील, पण तिची गाणी कोणत्या दर्जाची होती हे आपण सर्वांना समजलेच आहे. तिचा पहिला क्रमांक आला यात फारसे आश्चर्य नाही.

एसेमेस फक्त ९ वाजेपर्यंत पोचावेत असे अनेकदा सांगितले होते. कार्यक्रम लाइव्ह असल्याने तो पुढे चालू राहणारच होता. संयोजकांनी काही फसवाफसवी केली असे वाटत नाही.