Secular शब्दाचा अर्थ इहवादी असा आहे.
माणसाच्या बाबतीत, सेक्युलरचा इहवादी हाही एक अर्थ आहे. म्हणजे कुठल्याही धर्माशी संबंध नसलेला, अधार्मिक. नास्तिक, पाखंडी. अपवित्र. भारतीय राजकारणी घेतात तसला हिंदूंशी वाईट वागणारा आणि इतर धर्मियांच्या दाढ्या वगैरे कुरवाळणारा असा अर्थ घेणे अयोग्य आहे. सर्वधर्मसमभाव बाळगणारा हाही अर्थ चुकीचा आहे.
आणखी अर्थ: शेकडो किंवा अनेक वर्षात एकदाच घडणारे; एकदा घडले की अनंतकालपर्यंत टिकून राहणारे, वगैरे.
मराठी माणूस एकाचवेळी हिंदुत्ववादी, मराठी, भारतीय आणि निधर्मी असू शकतो. यात चर्चा करण्यासारखे काही नाही.
अवांतरः भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 'हिंदुधर्म हा रिलिजन म्हणजे उपासनापंथ नाही' असे एका निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे खरा हिंदू अधार्मिक(कुणाचीही उपासना न करणारा), नास्तिक, पाखंडी म्हणजेच सेक्युलर असू शकतो, नव्हे असतोच.