हल्ली, म्हणजे मूळ कविता आल्यावर खोडसाळचे विडंबन कधी याकडेच जास्त लक्ष लागून राहते.
मूळ खरेच 'बोल्ड अँड ब्युटिफुल' असलेल्या कवितेचे हे धमाल विडंबन जमले आहे... नवकवींवर तुमचा येव्हढा राग का हो? बिचारे आपले कविता पाडतात इमाने इतबारे....
रचावे काव्य कोणीही, कुणी मोरीत रेकावे
कुणा थोडे मिळाले मद्य की तो लावतो चाली
रडावे वाचकाने, काव्य वाचुनिया किती वेळा
चला झटकून टाकूयात या अंगावरून पाली
हे मस्तच!
तुमच्या या गंधाच्या उलाढाली वाचून (पहिला शेर) खरेच मळमळते आहे.........
पण खूप मस्त प्रयत्न!