पुस्तके ही, "रिटन कम्युनिकेशन" चा एक प्रकार असतात, जे "रिटन कम्युनिकेशन" चे फायदे वा तोटे तेच पुस्तकांचे सुद्धा.
पुस्तकांचा उपयोग मी, इच्छित स्थळी जाण्यासाठी, लागणाऱ्या "नकाशा" प्रमाणे करतो, त्यातले काय तंतोतंत घ्यायचे, काय पुर्णपणे टाळायचे, काय अर्धे घ्यायचे काय सोडायचे, काय, किती, कसे, कुठे, का, केंव्हा घ्यायचे, ते सगळे मी ठरवतो.
सहसा पुस्तकातली तत्त्वे ग्रहण करण्याकडे माझा कल असतो त्यांचे उपयोग किती कालाबाधीत वा कालबाह्य ते तपासून पाहतो.
काही कौशल्ये पुस्तकात वाचुन आत्मसात करता येत नाहीत, त्याचसाठी "विज्ञानात" प्रात्यक्षीक "प्रयोग" करण्याकडे प्रोत्साहन दिलेले असते.
व्यक्तींचे अनेक वैयक्तीक प्रश्न हे सहसा सामायीक असतात. [ ल. सा. वि. वा म. सा. वी. प्रमाणे] त्यांचे इतरांनी शोधलेली उत्तरे कधी कधी आपल्या बाबतीत जशी च्या तशी लागू पडण्याची शक्यता असते. म्हणजे इतरांचा सदरा कधी कधी आपल्या अंगाला फिट्ट बसतो. नेहमीच बसेल असे नाही. तरी ज्याने त्याने आपापले सदरे आपल्याला "मनोकायीक" बसतील असे शिवावेत.
धन्यवाद!