आज सर्वत्र इग्रंजी चा उदो-उदो चालु आहे. या पार्श्वभुमी या गोष्टी तुन ज्यास्तीत ज्यास्त शास्त्रशुध्द कसे शिकता येइल याचा परिपाठ.

होम्सचे ४ मोठ्या गोष्टी ( हॉउंड ऑफ बेसकरव्हील इत्यादी ) आणि ५६ छोट्या गोष्टी असे वर्गीकरण करता येईल.

ज्याचे इग्रंजी सर्वसाधारण दर्जाचे आहे, ज्याला आपल्या इग्रंजी भाषेमधे लक्षणीय सुधारणा करावयाच्या असतील त्याने हा प्रयोग करायला हरकत नाही. होम्सच्या एकून ५६ छोट्या गोष्टी आहेत. प्रत्येक आठवड्यात १ अशी गोष्ट जर वाचली तर १ वर्षा मधे पुर्ण होम्स वाचून होइल. प्रत्येक गोष्टीमधुन १० नवीन शब्दांचा साठा वाढतो आहे असे गृहीत धरले तर वर्षभरात अंदाजे ५२० ते ५६० नवीन शब्द माहीत होतील. नवीन वाक्यप्रयोग, नवीन नवीन कल्पना, सभाषण चातुर्य, आपोआपच वाचण्याचा वेगही वाढेल.

समजा, तुम्हाला असाच एखादा समान आवडीचा स्नेही सवंगडी मिळाला तर, चर्चेतुन अनेक पैलुही समजत जातील. स्वयमध्ययनाचीही सवय लागेल.

माझा अनुभव असा आहे कि, या एका वर्षात या अभ्यासमडंळातुन जितके शिकायला मिळाले ते मी मागच्या २० वर्षात शिकु शकलो नव्हतो.

चागंल्या गोष्टीचा ध्यास घेणे हेतर प्रगतीचे रहस्य आहे. करुन तर पहा....