ऋचा ताई , सहमत पण मला वाटते पालक लागण्याचा जरा जास्तच बाउ करतात. किंवा मुलाला जास्त घाबरवून सोडतात.

मी स्व्तः अनेक पालकांच्या व मुलांच्या  घरी गेलो आहे जातो आहे.

मला अपेक्षित वयोगट ७-१५ हा आहे. ज्या वयोगटात मानसिक जडणघडण ही घडत जाते.

हे खेळातले अंग बचावणे पुढे जीवनात हि परावर्तित होते.     हा आहे.

(अमेरिकेतील ताईंनी म्हटल्याप्रमाणे) एकलकोंडेपणा , आत्मविश्वासाचा अभाव , स्वतः पुरते पाहण्यची वृत्ती, जीवनात छोट्या छोट्या गोष्टीत जबाबदारी झटकणे अगर नीट पाऱ न पाडू शकणे ई. दिसून येते. कदाचित मी यादी फारच मोठ्ठी केली असेल.

तसेच या सगळ्या गोष्टी तशाच दिसून येतात असे नाही पण काही अंशी निश्चितच दिसतात. या केवळ न खेळल्यानेच होतात असेही नाही. पण न खेळणे त्यातील एक प्रमुख आहे.

बाकी, तुम्ही सुचवलेले उपाय अगदी माझ्या मनातील. पालकांचा सहभाग व  पाठींबा हवाच.