१९४७ मध्ये बिकानेर इथे एका जिप्सी कुटुंबात जन्मलेली रेशमा पाकिस्तानात लाहोर येथे राहते.  आपल्या टोळीबरोबर भटकत असते. ती अशिक्षित, आणि तिचे कुटुंब अशिक्षित आणि कर्मठ असल्याने रेशमाला उघडपणे गायला परवानगी नाही. सुभाष घईंनी एकदा अमृतसरला असताना तिचा आवाज ऐकला.  त्यांनी तिला हिंदी शिकवले आणि तिच्याकडून 'लंबी जुदाई' गाऊन घेतले आणि आपल्या 'हीरो' या चित्रपटात टाकले. 'दमादम मस्त कलंदर' मूळचे तिचे.  नंतर ते गाणे रूना लैला गाऊ लागली.