इतर देशांपैकी मी इंग्लंड बघितलेला आहे. तेथे मुली असे कपडे घालतात. पण त्या दुटप्पी नसतात. म्हणजे कुणी कमेंट केल्यास भित्री भागुबाई सारख्या वडीलांजवळ कंप्लेंट करत नाहीत. त्या मॅचुअर असतात. त्या देशात असले कपडे घालतात, पण त्यांचे देशात व्यक्तीस्वातंत्र्य ही असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी समाजमान्य आणि एकमेकांना पूरक असतात. म्हणजे, कपड्यातल्या मोकळेपणासोबत त्या देशांत शरीर संबंधा बाबत सुद्धा मोकळेपणा आहे. (असा मोकळेपणा पूर्वीपासून असल्याने कपड्यांत पण मोकळेपणा आहे.) तसे असल्याने कपडे आपोआपच कमी असतात. आपल्या येथे सगळीकडेच सारख्या विचारांचे लोक राहात नाहीत. ठराविक श्रीमंत वर्ग या पाश्च्यात्यांसारखे राहातो. आणि सगळेच (कपड्यांच्या बाबतीत-मुली) त्याचे अंधानुकरण करतात, आणि घरात मात्र कर्मठ वातावरण. असा विरोधाभास असतो.

पाश्च्यात्य असा विरोधाभास नाही. तेथे पब, कमी कपडे, लग्ना आधी शरिरसंबंध, विवाहबाह्य संबंध याकडे बघण्याचा दृष्टीकोण आपल्या सारखा नाही. वेगळा आहे.

आपल्या येथे फक्त त्यांच्या फॅशनचे, कमी कपड्यांचेच अनुकरण करणार, आणि बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत मात्र ठणठणाट.

पाश्चात्यांचे अनुकरण करायचे असेल तर सरसकट करावे, अर्धवट नाही. नाहीतर करू नये.

मादक कपडे घालणार, मात्र कुणी कमेंट केली, तारिफ केली तर त्याच्यावर डाफरणार, साळसूदपणाचा आव आणणार.

इतर देशांत कुणी फिगरबद्दल कमेंट केली तर थॅंक्स म्हणतात, वडीलांजवळ, भावाजवळ  तक्रार करत नाहीत.

बघा पटतंय का माझं म्हणणं?