पण त्या दुटप्पी नसतात. म्हणजे कुणी कमेंट केल्यास भित्री भागुबाई सारख्या वडीलांजवळ कंप्लेंट करत नाहीत. त्या मॅचुअर असतात.
सहमत आहे. पण याचबरोबर परदेशातील मुलेही बहुतांशी करून आपल्या रोडसाइड रोमिओप्रमाणे वागत नाहीत. किंबहुना बहुतेक मोठ्या शहरांमध्ये मुलींनी असे कपडे घातले तरी कॉमेंट करण्याचे प्रकार फारच कमी दिसतात. दुसरा फरक म्हणजे या बाबतीत मोकळेपणा असल्यामुळे तिथल्या मुलांच्या नजरांमध्येही मोकळेपणा असतो. याउलट भारतातील रोमिओंच्या नजरांमध्ये बहुतेक करून एक प्रकारची वखवख असते जी स्त्रियांना चटकन लक्षात येते. (याचा अर्थ असे प्रकार होत नाहीत असा नाही पण त्यांचे प्रमाण बरेच कमी आहे. )
हॅम्लेट