ज्योतिष्य हे मुळात केवळ भविष्य जाणून घेण्यासाठीच सुरू झालं हे मला पटत नाही. प्रत्येक कार्यामागे कारण असतेच, हे पदार्थविज्ञानचे सुत्र आहे. तसेच घडलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची कारणमीमांसा करणे आणि तशीच घटना पुढे होइल का ? याचा अंदाज घेणे हे भविष्य शास्त्राचे (! ) उद्दीष्ट असावे.

प्रत्येक शास्त्रात बरेचदा अंदाज चुकतात, मग केवळ भविष्य च्या बाबतीत असं का म्हणावं ?

एक गोष्ट मान्य की इतर शास्त्रांप्रमाणे ते अजुनही परिपुर्ण नाही, पण त्याला आपण नाकारूही शकत नाही.

विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे, माझ्या मते प्रत्येकाचा प्रश्न आहे.

उत्पन्नावर कर देणे / असणे याला मुळिच आक्षेप नाही, पण त्यासाठी त्याला धंदा / व्यवसाय म्हणून अधिकृत करावे लागेल.  

यावर अधिक चर्चा होणे योग्य. यात क्वांटम गतिकीचा मुद्दा सुद्धा विचारत घ्यावा लागेल.