ऋचा तुझे म्हणणे खरे आहे. माझे त्या दिशेने प्रयत्न सुरुच असतात.
आणि मी आणि माझा मुलगा दोघेही खेळताना लागले तरी घाबरत नाही. पण इथले काही पालक खुप विचार करतात असे वाट्ते.खेळताना लागेल त्यापेक्षा घरात कार्टून लावून देतात. मी त्याला सायकल खेळायला पाठवते व आजुबाजुला राहाते.घरातही तो वेगवेगळे खेळ खेळतो पण सवंगड्यांबरोबर खेळण्याची मजा काही औरच असते.
नवीन आहोत अजून इथे व त्याच्या वयाची मुले पण आसपास नाहीत पण पुण्याला खुप हुंद्डायचे सारे मुले.पण इथे जरा वेगळे जाणवले म्हणून लिहिले. 'अमेरिकन ताई ' असे वाचून मजा वाटली.
इतरांना हा मुद्दा इतका महत्त्वाचा वाटणार नाही पण आहे तो इथे मांडल्याबद्दल सर्वदमन यांचे आभार.