रिऍलिटी शोज मध्ये आतापर्यंत जिंकलेले सर्व लोकं आता काय करत आहेत ? यातून मिळणारी प्रसिद्धी नेहमीसाठी नाही राहत.
आपला (मराठी) अभिजित सावंत सध्या काय करतोय. (करत असेल तर उत्तम. ) हर्षवर्धन नव्हाते, इ.
कोण जिंकल, यापेक्षा मजा आली की नाही ते महत्त्वाचं. पल्लवीने शेवटी घाई केल्यासारखं वाटलं. सर्टीफिकेट व ट्रॉफी वितरण थोड व्यवस्थित झलं असतं तर अजून मजा आली असती. पण असो.
पहाटे ३:३० पर्यंत कार्यक्रम बघितला, (कोरिअन वेळेनुसार), पण मला आवडला.....
शेवटी ही एक स्पर्धा होती. पण कुठेही (हिंदी सा रे ग म सारखं) भांडणं, दिखावा नव्हता..... छान वाटले. झी मराठीचे आभार.
कित्येक गाणी प्रथमच ऐकली, तर इतर पुन्हा एकदा..... सर्व कलाकारांचे आभार