सुंदर वर्णन. जणू आपलीच सप्नातली ही बाग असावी असे वाटले. आणखी ही खूप फळझाडे असती तर आणखी मजा आली असती. पुण्यासारख्या ठिकाणीच हे विशेषतः शक्य असावे आता. ज्या मुलींना लग्नापूर्वी - माहेरी बागेची सवय असेल, त्याना लग्न झाल्यावर मुंबईसारख्या शहरात जावे लागले, तर तोच आनंद मिळणे अगदीच दुरापास्त! पण ते असो. मुळात अशा प्रकारचा निर्भेळ आनंद आयुष्यात मिळावा हीच एक फार मोठी गोष्ट आहे.