ज्योतीष हे शास्त्र असेलच ते निरुपयोगी आहे; याबद्दल माझ्या मनात दुमत नाही!

पण भुषण कटककरांच्या मताशी मात्र मी सहमात नाही.

ज्योतिषी दुकान उघडून बसले आहेत हे खरे! पण त्यांच्या दुकानी जायचे अथवा नाही हे ग्राहकांनी ठरवायचे! ज्योतिषाचे उत्पन्न करपात्र नाही असे कोणी सांगितले? इतर सर्वांसारखाच आयकर कायदा त्याला ही लागू आहेच!

'ज्योतीष खोटे ठरले तर त्याला धंदा बंद करायला लावावा!' हे ही योग्य नव्हे! लोकच त्याचा धंदा बसवतील. (त्याच्याकडे ग्राहक जाणार नाहीत.)

ज्याला स्वतः बाबत उद्या काय होणार ते सांगता येत नसते, अशाकडून १००% खऱ्या होणाऱ्या भविष्याची अपेक्षा कशी करावी? जर त्याने टाकलेल्या जाळ्यात स्वतःच अडकयचे ठरवले तर कोणत्या तोंडाने निम्मी रक्कम नंतर देतो म्हणणार? उद्या बोलाफुलाला एकच गाठ पडून त्याचे भविष्य खरे ठरले तरी हा ग्राहक उरलेले पैसे देईल याची खात्री काय?

इतर अनेक व्यवसायासारखा हा ही एक व्यवसायच! त्या पोटभरू ज्योतिषाला नावे ठेवून काय फायदा? जाणऱ्यानेच आपल्याशी आगोदर विचार करावा हे उत्तम!