ते गाणे आपल्या चित्रपटात वापरले असे म्हणायला हवे असे वाटते. साधारणपणे, टाकणे या क्रियापदातून फेकणे, टाकून देणे त्याग करणे अशा जराशा नकारार्थी छटा प्रकट होतात असे वाटते. उदा. पानात अन्न टाकणे , केर टाकणे , एखाद्याचे नाव इ. टाकणे , एखाद्या माणसाला इतरांनी टाकणे ( वाळीत ? )
याउलट, साधारणपणे एखाद्या पदार्थात मीठ वगैरे जिन्नस घालतात, पेट्रोल वगैरे गोष्टी भरतात , चेंडू वगैरे गोष्टी दुसऱ्यकडे टाकतात, पत्र पाठवतात किंवा पेटीत टाकतात, मुलांना शाळेत घालतात / पाठवतात , पैसे इ. बँकेत भरतात असे वाटते. हल्ली या सरसकट सर्व गोष्टींसाठी टाकणे हे क्रियापद वापरलेले पाहून खटकते.
शुमंकडून हा शब्द ऐकून गंमत वाटली. त्यांनी या बाबतीत विवेचन करावे अशी त्यांना विनंती आहे.
बाकी लंबी जुदाई गाणे हे रेश्मा यांनी म्हटले आहे असे वाचल्याचे स्मरते. एके काळी त्यांच्या आवाजात हे गाणे इतके लोकप्रिय झाले होते की त्या नावाला अफाट मागणी होती आणि अगदी नव्या गाडीपासून ते घरांपर्यंत सर्व गोष्टींना रेश्मा असे नाव दिले जायचे असे एका बाईंनी आपल्या आठवणींमध्ये लिहिले होते. रेश्माबाईंचा आवाज खरोखरच खूप सुंदर आहे.
--अदिती