ह्या विषयाची विस्तृत चर्चा झाली आहेच तरी मला महित असलेल्या आणि कदाचित वर उल्लेखलेल्या काही गोष्टी पुनः सांगतो..
जंबुद्विप, आर्यावर्त याबरोबरच हिंदुस्थान, इंडिया ही देखील भारताचीच आणि तितकीच प्राचीन नावे आहेत.
कशी ते पाहूः
भारताच्या वायव्येकडील भागात (पाकिस्तान, अफगाणिस्तान इ.) 'स' ला 'ह' म्हणायची सवय असल्यामुळे किंवा बोली भाषाच तशी असल्यामुळे किंवा 'स' म्हणताच येत नसल्यामुळे तेथील लोक सिंधु ला हिंदु म्हणत. यावरुनच मग हिंदुस्थान असे नाव पडले आहे. (अजूनही राजस्थान सारख्या भागात किंवा त्या भागातून आलेले लोक उदा. 'सात रुपये' च्या ऐवजी 'हाथ रुपये' असा उल्लेख करतात. )
त्याचेच पुढे पर्शियन, स्किथियन लोकांनी 'स' किंवा 'ह' हे शब्द त्यांच्या उच्चारातच नसल्यामुळे किंवा सिंधु असा उच्चार करणे अवघड जात असल्यामुळे सिंधु ला इंदू, इंडू आणि त्यावरून इंडस, इंडिया असे नाव भारताला मिळाले आहे. त्यामुळे 'भारत' किंवा 'भरतवर्ष' हे सर्वात पहिले नाव आणि इंडिया हेही प्राचीनच. ते ब्रिटिशांनी वगैरे दिलेले नाही. नंतर ब्रिटिशांमुळे ते प्रचलित झाले असेल कदाचित... मध्ययुगीन आणि त्यानंतरच्या इतिहासाची मला फारशी महिती नसल्यामुळे याबाबत निश्चित सांगू शकत नाही.
तात्पर्यः
सिंधु = सिंधुस्थान = हिंदुस्थान (वायव्येकडील प्रभाव) = इंदू (पर्शियन, स्किथियन, ग्रीक, रोमन प्रभाव) = इंडू = इंडस = इंडिया (असे काहीसे झाले असावे.) त्यामुळे भरतवर्ष म्हटले काय इंडिया म्हटले काय किंवा हिंदुस्थान म्हटले काय अर्थ एकच, भारत.
प्रियाली यांनी 'इंडिका' या ग्रंथाचा कर्ता 'अपोलोनिअस' असा उल्लेख केला आहे. वास्तविक 'इंडिका' या ग्रंथाचा कर्ता 'मेगॅस्थेनिस' आहे. मेगॅस्थेनिस हा सिकंदराबरोबर भारतात आला आणि नंतर चंद्रगुप्ताच्या (मौर्य) दरबारी होता. त्याच्या इंडीका या ग्रंथात त्याने तत्कालीन समाज जीवनाची तसेच राजघराण्यांची वर्णने लिहून ठेवली आहेत. ह्या आणि अशा अनेक ग्रंथांमधील उल्लेखामुळे प्राचीन इतिहास काही प्रमाणात सुसूत्रपणे बांधणे शक्य झाले आहे.