शुद्ध मराठी, अंजनीसूता बद्दल आपले म्हणणे अगदी योग्य आहे. मी स्तोत्राचा पाठ तसाच दिला आहे. केवळ स्पष्टीकरणात मूळ शब्द दिला आहे. पुढे अर्थ २ मध्ये दिनानाथा (दीनानाथ) शब्दाच्या वेळी वृत्तासाठी असे करतात हे स्पष्टीकरणही दिले आहे. तसे आधी द्यायचे राहिले. सूचनेबद्दल धन्यवाद.
अर्थ २ मध्ये पावना या शब्दाचा अर्थ पवित्र असा दिला आहे. तो योग्य आहेच. त्याबरोबर दुसरा एक अर्थही येथे असू शकतो. मारुती हा पवनपुत्र आहे. म्हणून पित्याच्या नावावरून पावन असे नाव त्याला मिळालेले आहे. कोणताही अर्थ घेतला तरी फारसा फरक पडत नाही. अधिक चांगला पर्याय म्हणजे या शब्दावर श्लेष आहे असे समजून या दोन्ही अर्थांनी हा शब्द इथे समजून घेणे.
पुढील श्लोकांचा अर्थ पुढे पाहू.