तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. मला पडलेले काही प्रश्नः

निखिलने उल्लेख केल्याप्रमाणे सिथियन, पार्थियन हे ग्रीक वंशाचे राजे भारताकडे सरकत असताना जेव्हा अफगाणिस्तान, पाकिस्तान प्रदेशात आले तेव्हा तेथील लोक या नदीच्या प्रदेशाला हिंदू म्हणतात हे त्यांना कळलं तो उच्चार त्यांना जसाच्या तसा करणं शक्य नव्हतं त्यामुळे त्याचं इंडू झालं.

पुरावे द्या. हिंदू हा शब्द एवढाही प्राचीन नाही, असे मला वाटते. कापसाला ग्रीक भाषेत सिंडॉन म्हणत असत. मग हा सिंडॉन हा शब्द कुठल्या शब्दावरून आला बरे? सिंदू की सिंधू? हिंदू हा शब्द फार जुना नाही. अमरकोशातही हिंदू हा शब्द नाही असे वाटते.


भाषाभिमानी हिंदी भाषकांनी त्याचं हिंदुस्थान असं संस्कृतीकरण केलं इतकंच.
भाषाभिमानी हिंदी भाषकांनी की हिंदुत्ववाद्यांनी? माझ्यामते हिंदुत्ववाद्यांनी.

त्याने हिंदुस्तान बरोबर आणि हिंदुस्थान चूक असं मात्र होत नाही. हिंदुस्तान आधी आणि हिंदुस्थान नंतर एवढंच काय ते खरं आहे.
हिंदुस्थान हा शब्द रूढ झाला असला तरी ह्याचा अर्थ भाषाशास्त्राच्या दृष्टीने तो बरोबर होत नाही, असे वाटते.


त्याप्रमाणे हिंदू प्रदेशाचं वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे इंडिका.
हिंदू प्रदेश म्हणजे काय बरे? सिंधू नदीचा प्रदेश काय? की हिंदूंचा प्रदेश?

शेवटी चूभूद्याघ्या.