नमस्कार
१. वासुदेव म्हणजे श्रीकृष्णच होय.
२. संपूर्ण भागवतात बलरामाचा कुठेही वासुदेव असा उल्लेख नाही. परंतु श्रीकृष्णचा मात्र वारंवार तसा उल्लेख आहे.
३. वसुदेवाचे पुत्र म्हणून दोघेही वासुदेव होतात हे जरी खरे असले तरीही वरील संदर्भाला अनुसरून " वृष्णीनां वासुदेवोस्मि"चा अर्थ श्रीकृष्णच होय.
४. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बलरामाच्या उभ्या आयुष्यात, त्याला कोणी देवत्व देण्यासारखे कोणतेही पराक्रम, प्रसंग नाहीत.
५. विभूतियोगात कृष्णाने ज्या विभूतींमध्ये स्वतःचे अस्तित्व सांगितले आहे त्या सर्व व्यक्ती/विभूती दिव्य कर्मी आहेत. बलरामाचे सामर्थ्य खूप मोठे असले तरीही विभूती बनण्यासारखे कृत्य केल्याचे दिसून येत नाही. परंतु कृष्णाची साधी क्रियाही दिव्य असल्याचे आढळून येते.
६. गीता सांगताना श्रीकृष्ण ज्या योगारूढ अवस्थेत होते त्यावरुनही त्यांनी विभूतियोगात स्वत:चा उल्लेख वासुदेव असा करणे अस्वाभाविक नाही.
७. वृष्णी हा खूप मोठा वंश होता. यादव, शूर, भोज ही सर्व कुळे वृष्णिवंशातील होत. (विष्णुसहस्रनामात याचा उल्लेख आहे.
"शूरसेनो यदुश्रेष्ठो", "शौरिः शूरजनेश्वर:")
म्हणून वृष्णीनां वासुदेवोस्मि मध्ये वासुदेव म्हणजे श्रीकृष्णच होय हे निःसंशय.