नमस्कार,
ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे जुनी झाल्यावर टाकून देऊन नवीन घेतो, त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून जातो.
ह्या सिद्धांतात, आत्म्याचे गुण वर्णन केले आहेत. शरीराचे नव्हेत. तसेच यात कोठेही नवे शरीर सोडून जात नाही असेही म्हटले नाही.
अर्जुनाला आलेले क्लैब्य घालवण्यासाठी भगवान त्याला म्रुत्यू म्हणजे काय हे सांगत आहेत.
महाभारतकाळाचा विचार केला तर, त्या काळात अपम्रुत्यूंचे प्रमाण दुर्मिळ किंबहुना नव्हते. त्यामुळे तरणेबांड शरीर वा बाल शरीर सोडून जाण्याचा प्रश्नच येत नव्हता.
"जीवेत शरदः शतम" चा काळ होता.
तसेच आत्मज्ञान ही फक्त अनुभवाची गोष्ट असल्यामुळे आत्म्याचे वर्णन फक्त माहिती करून घेण्यासाठी उपयोगात आणावे लागते.
दुसरी गोष्ट अशी की, ध्वन्यर्थ आणि शब्दार्थ यातले अंतरही समजले पाहिजे.