याला सिक्स्थ सेन्स असच म्हणावं लागेल...मे बी जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीचा विचार करत राहता आणि मग स्वप्न वगैरे पडत राहतात त्या बद्दल ..कारण म्हणतात ना जे मनी वसे ते स्वप्नी दिसे ..
पण एकदा माझ्या आईला स्वप्न पडलं होतं की माझे आज्जी आजोबा आले आहेत मुंबईवरून ( म्हणजे तिचे सासू सासरे ) तो रविवार होता आणि आम्ही उठल्यावर तिने संगितलं की असं असं स्वप्न पडलं, आणि यू वोंट बिलीव साधारण अकरा च्या सुमारास खरच आले की आज्जी आजोबा मुंबईवरून , ते आम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून न सांगता निघाले होते. तो योगायोग म्हणायचा की सिक्स्थ सेन्स काय माहिती, परीक्षेच्या वेळी मला झोपेत असं स्वप्न पडायच की अर्धच तास राहिला आहे आणि माझा पुर्ण पेपर सोडवून व्ह्यायचाय किवा एखाद्या कड्यावरून अचानक ढकलून दिलं आहे कोणीतरी वगैरे.. आणि जाग यायची