मला या लेखावरून पुलं ची एकांकिका - सदू आणि दादू - आठवली. त्यात एका परिवर्तनात दादूला कविवर्य एक ग्रंथ वाचायला देतात आणि मग त्या रुकडीकराचे 'आधी शिम्म होतं त्याचं शेळी झालं की ओ' असं होतं.
मला वाटते, की सुभाषित लागू / गैरलागू, किंवा कालबाह्य वगैरे आहे हा विषयच मनात न धरावा, तर या लेखाचा विषय उत्तम आहे, आणि प्रतिपादन ही अतिशय छान विस्ताराने, सोदाहरण झाले आहे. मजा आली.