शीर्षक फारच आवडले!
कितीही व्यस्तता असली, तरी आपल्याला अधिकतम जिव्हाळ्याची गोष्ट माणूस विशेष प्रयत्न करून पार पाडू शकतो असे माझे मत आहे. सर्वच प्रयत्नाना सारखेच यश येत नाही हे तर अर्थातच खरे; पण त्या त्या वेळी आपल्याला इतर काही वस्तू गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटल्या, म्हणून बाकी काही राहून गेल्या असे होत असावे.
या शिवाय, अमूक वाचलेच पाहिजे  म्हणून जे वाटले होते, ते प्रत्यक्षात जेव्हा वाचून संपवले, तेव्हा असेही जाणवते, की वाचण्यापूर्वी वाटलेली ओढ ही अनावश्यक होती.
वूदरिंग हाइटस मी वाचले. सुरुवातीला त्यातल्या नात्यांच्या क्लिष्टतेमुळे थोडा धीर धरावा लागला, पण एकदा गोडी लागल्यावर, संपेपर्यंत ठेवावेसे नाही वाटले.
हा इतका छान विषय आहे, की तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, तो अनेक इच्छांना / आवडीना लागू पडतो! प्रवास, वाचन, कला - काहीही. अगदी 'निसटुनि जाई संधीचा क्षण, सदा असा संकोच नडे' पर्यंत!