मलाही असेच वाटायचे आणि तसे अनुभवही आलेले आहेत. पण यावर माझ्या एका विज्ञानकथा लेखक मित्राशी चर्चा केली असता त्याचे म्हणणे वेगळे पडले. आपल्याला आधी जे अनुभव आलेले असतात त्यमुळे एखाद्या व्यक्तिच्या बाबतीत तो काय बोलेल अथवा कसा वागेल हे मेंदूतल्या आधीच्या माहितीवरून पृथकःरण होते व त्यामुळे आपल्याला अपेक्षितच उत्तर मिळते. आपला मेंदू हा संगणकासारखा काम करत असल्यामुळे तो प्रत्येक अनुभवाचे विश्लेषण करत असतो व ते आपल्या हार्ड डिस्क मध्ये साठवलेले असते. त्यातूनच तुम्हाला संभाव्य उत्तराची वा घटनेची चाहूल लागते.