हिस्टरी चॅनलने ताबडतोब आणि आमूलाग्र बदलावे (अशी माझी न विचारता केलेली सूचना).
तुमची सूचना ऐकली हो त्यांनी. ताबडतोब नाही पण आमूलाग्र बदल घडवून आणला. आता ती फॉक्स हिस्टरी अँड एंटरटेनमेंट झाली आहे. त्यांनी जो बदल घडवून आणला त्यानंतर तर आधीचीच वाहिनी बरी होती असे वाटायला लागले आहे.
आणखी एक वाहिनी आहे, केअर वर्ल्ड. जी आधी ७ स्टार केअर नावाने चालू होती. ह्यावरचे कार्यक्रम मी नीट कधी पाहिले नाही परंतु एकदा पाहिले तेव्हा Laughter is best medicine नावाखाली लाफ्टर चॅलेंज किंवा तत्सम कार्यक्रमातील विनोद दाखवत होते. विनोद ठिक आहे हे पण आजकाल त्या कार्यक्रमांतील विनोदाचा दर्जा ज्याप्रकारे खालावला आहे की त्याला औषधी म्हणून वापरावे हेच हास्यास्पद वाटले.