ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही, हा भाग वेगळा. पण जर त्याच्या अभ्यासाची विद्यापीठ स्तरावर सोय केली, तर सामाजिक शास्त्रांप्रमाणे त्यातही संशोधन करता येईल. त्यातून निदान हे प्रकरण केवळ अंधश्रद्धेपोटी शतकानुशतके चालत आले की त्यातही काही परंपरा, नियम, सूत्रे, प्रमाणके आहेत याचा शोध घेता येईल. आता तरी असे संशोधन होताना आढळत नाही. अर्थात, संशोधन तरी किती चांगले असेल ही शंकाच आहे, कारण इतर शास्त्रांतील संशोधन फारसे समाधान कारक वाटत नाही. एक वेळ अशा अभ्यासाची सोय केली नाही, तरी काही काळापुरता एखादा संशोधन प्रकल्प नक्कीच राबविता येईल.निदान काहीतरी  भविष्य सांगून पैसा उकळणाऱ्या कुडमुड्या ज्योतिषांचा धंदा बसविण्यासाठी काही प्रमाणात हे पदवीधर ज्योतिषी उपयोगी पडतील.