हाथ कर! सारखंच हे एक. जरा लागलं की उगाच मुलांच्या मदतीला न धावता त्यांना स्वतःच त्यातून सकारात्मक रीत्या बाहेर काढण्याचे हे आईबाबांचे जुने उपाय मस्त होते. गुडघा/ दोकं आपटलं जरासं की आमचे बाबा म्हणायचे, जाउदे उंदीर पळाला. त्यामुळे न गुडघा फुटल्याची कधी भीती वाटली न उंदराची! आजी म्हणयची, "जा काऊला सांग त्या आमच्या टेबलाला घेऊन पळ." किंवा हे पण ऐकलंय, आपण त्याचं घर उन्हात बांधू हां... " हे खोटं असतं सगळं पण मुलांचं लक्ष त्या छोट्याशा दुखापतीपासून दूर वळतं मात्र हमखास!