भाषाभिमानी की हिंदुत्ववादी हा मुद्दा मला वाटतं वैयक्तिक मान्यतेचा आहे. मी यावर काही बोलणार नाही. आपले मत आपल्या ठिकाणी योग्य आहे.
अर्थातच.

यासंदर्भात दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की, भाषाशास्त्र भाषा घडवत नाही.
भाषाशास्त्र भाषा घडवत नाहीच. पण हिंदुस्तान हा शब्द रूढ असताना त्याचे (काहींच्या मते भाषाभिमान्यांनी, तर काहींच्या मते हिंदुत्ववाद्यांनी) हिंदुस्थान केलेले आहे. हिंदू ह्या फार्शी शब्दाला स्तान हा फार्शी प्रत्यय वापरणे योग्य एवढेच मला म्हणायचे होते. बाकी काही नाही. हिंदुस्थान हा शब्द मला डिटेलवार, ड्यांबिसपणा ह्या शब्दांसारखाच वाटतो.

हिंदू या शब्दाचा पर्शिअन इतिहासातील पहिला ज्ञात उल्लेख नेमका शोधून मी कळवते.
 हिंदू हा शब्द काळेपणासाठी विशेषण म्हणून फार्सी भाषेत वापरला जात असे.  ह्या आधीच्या एका प्रतिसादात एक फार्सी द्विपदी दिली आहे.