प्रीति, लेख छान झाला आहे. खास पुणेरी मळमळीवरचं भाष्य मस्त जमलंय. पण विषयांतराचा दोष पत्करून एक प्रश्न विचारते.

त्यांत प्रामुख्यानं तथाकथित उच्चवर्णीय सुशिक्षित/उच्चशिक्षित लोकांचा समावेश होता. हे तुमचं वाक्य बघा. यातल्या तथाकथितनं उच्चवर्णीयची धार खरंच कमी होते का? की जरा अधिकच परजली जाते?

आडवळणानं जाऊन उच्चवर्णीय म्हणण्यापेक्षा सरळ ब्राह्मण का म्हणू नये? ब्राह्मण हे एका जातीचं नाव आहे. त्याच्या किंवा कोणत्याही जातीच्या नावाच्या उच्चाराने जातीय उतरंडीचा प्रत्यक्ष उल्लेख होत नाही. मग ते उच्चारण्याचा बागुलबुवा टाकून का देऊ नये?

ब्राह्मण असा उल्लेख करणं हे जितकं जातीयवादी वाटतं त्यापेक्षा तथाकथित उच्च्वर्णीय, खालच्या मानल्या गेलेल्या जातीचा, असे उल्लेख जास्त जातीयवादी आहेत; सुप्त पातळीवर आपल्या मनात शिल्लक असलेल्या सामाजिक उतरंडीचे प्रतीक आहेत असं मला वाटतं. वरच्या जातीतला, खालच्या जातीतला असं म्हणवण्यापेक्षा अमक्या जातीचा असा स्पष्ट नावानिशी उल्लेख कोणत्याही जातीच्या माणसाला अधिक अभिमानास्पद/स्वीकारार्ह असेल.

मला तुमच्यावर आरोप करायचा नाहिये, उलट एक सूचना आहे की जातीचा नामोल्लेख न करण्याचा बागूलबुवा टाकून देऊया.

बघा पटलं तर.....