परीक्षेच्या वेळी मला झोपेत असं स्वप्न पडायच की अर्धच तास राहिला आहे आणि माझा पुर्ण पेपर सोडवून व्ह्यायचाय किवा एखाद्या कड्यावरून अचानक ढकलून दिलं आहे कोणीतरी वगैरे >>

उंचावरून खाली पडत असल्याचे स्वप्न बऱ्याच जणांना पडते. फ्रॉईडने दिलेले याचे मनोशारिरीक कारण म्हणजे झोपेत असताना हात किंवा पायाचा काही भाग (पलंगाबाहेर येउन) अधांतरी राहणे. असेच बऱ्याच जणांना हवेत उडत असल्याचे स्वप्न पडते. त्याचे कारण म्हणजे अंगावरचे पांघरूण दूर होऊन (पंख्याच्या) वाऱ्याचा झोत अंगावर येणे. अजुनही बरीच आहेत. आठवली तर लिहिन.

परीक्षेला एका विषयाचा अभ्यास करून गेलो असताना भलत्याच विषयाचा पेपर हातात पडल्याचे स्वप्न मला बऱ्याच वेळा पडते. कारण माहित नाही.

चर्चाविषयाबद्दल बोलायचे तर लेखकाने/इतरांनी काही विशिष्ट (specific) उदाहरणे दिल्यास (अर्थात खाजगी माहिती वगळून/बदलून) कदाचित काही मत व्यक्त करणे शक्य होईल.

इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स: सिग्मंड फ्रॉईड.