दोन पै, उखाण्यांचं असं आहे-

पहिला उल्लेख हा जुन्या काळात कुणीतरी आपल्याला कोड्यात पाडून निघून गेलं, आपल्याला कुणाचंतरी वागणं कळलंच नाही. अशा अर्थाचा आहे. त्या आठवणी उगाच काढून परत आपला गोंधळ/दुःख का वाढवा? असा पहिल्या कडव्याचा रोख आहे.

भूतकाळातील दुःखे आठवून बरेचदा दुःख होत नाही उलट आनंद होतो, नवी उमेद येते असा अनुभव आपण घेतला असेल. ह्या कवितेचा स्थायीभावच असा एक अनुभव आहे. त्यामुळे शेवटच्या कडव्यातला उल्लेख हा अधिक सकारात्मक दृष्टिकोणातून केलेला आहे. की ज्या कुणी मला न झेपलेले उखाणे घातले होते, त्याच व्यक्तीला मी माझ्या नव्या उत्साहात उखाणे घालायला लागले आहे, त्या व्यक्तीला कोड्यात पाडेल इतकी मी तेव्हापासून नवी झाले आहे, असा काहीसा अर्थ आहे.

कुतूहलाबद्दल आभार.