प्रतिसाद दिलेल्या सर्व मनोगतींचे अगदी मनापासून आभार!

मला प्रोफेशनल ऍनिमेशनपट बनवायाचा नाही आहे. पण बघायला खुप आवडतात!!. परवाच मी 'अ बग्स लाईफ' हा चित्रपट पाहिला. अतिशय सुंदर आहे.  त्यामुळे आठवड्यातील सुट्टीचा वेळ (मिळालाच तर! ) स्वतःच्या आवडत्या गोष्टीमध्ये गुंतवावा असे वाटले. म्हणून एक साधाच प्रयत्न करायचे म्हणतो.

ऋचा मुळेः
ह्या विषयाबद्दल माहिती नसतानाही आपण गुगलवर दुवे शोधलेत त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. जर मला ऍनिमेशन जमले तर मी निश्चीतच ईथे त्याची माहिती देईन.

विवेक दाणीः
सहकार्याबद्दल घन्यवाद. मी १०-१५ दिवस बाहेरगावी जात आहे. परत आल्यावर आपणास फोन करेन.


उपलब्ध आयुधांमधून मला त्रिमितीय सिनेमा बनवता येईल काय? माझ्याकडे काही खेळणी तसे १-२ चांगली निसर्ग चित्रे आहेत. ह्याचा काही वापर करता येईल काय?