"तथाकथित उच्चवर्णीयां"त ब्राह्मणांशिवाय कोण कोण येतात?

जात विसरून सर्व समरस व्हावेत या साठी आज वर जे प्रयत्न झाले, चालू आहेत त्यातील एक भाग म्हणून जात उच्चारणे टाळावे.

ठीक आहे. एकवेळ मान्य. पण मग त्याऐवजी उच्चवर्णीय, नीचवर्णीय, खालच्या जाती, निम्नस्तरीय जाती वगैरे असे स्पष्ट भेदभाव आणि स्तराचा फरक दाखवणारे शब्द वापरणे योग्य आहे की काय?

माझा आक्षेप या शब्दांतून अधिक स्पष्टपणे व्यक्त होणाऱ्या विषमतेला आहे. जातीचा, स्तराचा सगळाच उल्लेख टाळणे ही आदर्श स्थिती असेल पण ती अस्तिवात येण्यापूर्वीची पायरी म्हणून या शब्दांचा त्याग करणं जास्त अगत्याचं आहे.