उत्तम गुण प्रगटवावे । मग भलत्यासीं बोलतां फ़ावे।
भले पाहोन करावे । शोधून मित्र ॥ १५ ॥
("श्री दासबोध" दशक १९, समास २, श्लोक १५ )
अर्थ: उत्तम गुण अंगी असतील ते प्रकट करावे,
म्हणजे हवे त्याच्याशी बोलता येते,
आणि मैत्री, शोधून / पारखून नंतरच सज्जनांशीच करावी.