हे ६ व अवयव नाही हे नक्की कारण जी गोष्ट दिसते (किंवा मी अनुभवतो) ती पुढे केंव्हा घडेल हे मला महिती होत नाही....

ऑर्गनायझेशन बिहेवियर मधील ग्रूप डायनॅमिक्स या उपविषयात तुमच्या ६ व्या अवयवाच्या अस्तित्वाचे रहस्य उकलते.

त्यात असे म्हणतात की समजा २ व्यक्ती आहेत, मग तिथे जास्तितजास्त ३ "entity" [ भाषांतर--बहुधा " अभिव्यक्ती" ] असतात. त्या दोघांची "जोडी" हे एक स्वतंत्र "व्यक्तीमत्व" असते.

याच प्रमाणे २ और २, ५.  म्हणजे त्यांची "चौकडी" हे स्वतंत्र ५ वं व्यक्तीमत्व.

तसेच आपल्या ५ ज्ञानेंद्रिया बाबत. जेंव्हा [ साधारण--- अती-असुरक्षीत मेंदुच्या स्थितीत ] जेंव्हा पाचही ज्ञानेंद्रिये चरम / अति उत्तेजीत असतात, तेंव्हा अशा ६ व्या अतिंद्रियाचा साक्षात्कार होतोच.

शास्त्रज्ञ "केक्युलेने"  बेंझीन चे सुत्र सतत मनन, चिंतन केले आणी  चमत्कार असा की एक दिवस त्याला स्वप्नात एक साप आपली शेपटी तोंडात धरल्याचे दिसले. असे शास्त्रज्ञ मंडळी, हेर मंडळी, विश्‍लेषक मंडळी, खेळाडू, त्यात ही महिला वर्ग यांच्या सोबत फार वेळा घडते. याच्या सिद्धतेसाठी, कदाचीत उजव्या "सृजनात्मक" मेंदुचे अतीप्रगत असणे महत्त्वाचे ठरते.

धन्यवाद!